- बेळगावमध्ये परंपरेनुसार रविवार दि १९ एप्रिल रोजी शिवजयंती
मंगळवारी २१ रोजी चित्ररथ मिरवणूक
बेळगाव :
बेळगावमध्ये वैशाख शुद्ध द्वितीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेच्या आदले दिवशी पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते,तसेच तिसऱ्या दिवशी भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते.
यावर्षीही रविवार दि.१९ एप्रिल रोजी शिवजयंती साजरी होणार असून मंगळवार दि २१ रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे.
गेल्या आठवड्यात जत्तीमठ येथे मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे रविवार दि १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजल्यापासून विविध गडकिल्ल्यावरून आणण्यात येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक येथे मध्यवर्तीच्या वतीने करण्यात येणार आहे.
त्यानंतर सकाळी ठीक ९.०० वाजता नरगुंदकर भावे चौकातील मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन- आरती करण्यात येईल.
मध्यवर्तीच्या वतीने सकाळी १०.०० वाजता छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथील शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार घालून वंदन करण्यात येईल.मंगळवार दि २१ रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता नरगुंदकर भावे चौकात मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करून अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होणार असून त्यानंतर पालखी आणि चित्ररथ मिरवणूक मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, डॉ राजेंद्रप्रसाद चौक, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक, किर्लोस्कर रोड, जत्तीमठ मार्गे सम्राट अशोक चौक,रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, मुजावर गल्ली, पाटील गल्ली कपिलेश्वर उड्डाणपूल मार्गे कपिलेश्वर मंदिर येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे.
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून यावर्षी १०७ वी शिवजयंती साजरी केली जाणार आहे.
तरी या सर्व कार्यक्रमांना सर्व शिवभक्त आणि नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्यवाह मदन बामणे शिवराज पाटील आणि सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
बेळगावमध्ये परंपरेनुसार रविवार दि १९ एप्रिल रोजी शिवजयंती मंगळवारी २१ रोजी चित्ररथ मिरवणूक
Related Posts
शाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी
Spread the loveशाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी न्यूज: बेळगावातील शाहापूर परिसरात शिवसंस्कृतीचा गौरवशाली वारसा जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने शिवकालीन युद्धकलेचा भव्य आणि थरारक कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार
Spread the loveयेळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार येळ्ळूर दि. 17- येळ्ळूरमधील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर संपूर्ण सीमाभागात संतापाची लाट उसळली. मराठी भाषीकांच्या हृदयावर घाव घालून…
