*येळळूर येथे गवंडी व सेंट्रिंग कामगाराकरीता मार्गदर्शन मेळावा*
येळळूर, ता. ८ :
समाज सारथी सेवा संघ येळळूर यांच्या मार्फत गवंडी व सेंट्रीग कामगारकरीता मार्गदर्शन मेळाण्याचे आयोजन केले असुन हा मेळावा रविवार ता. ११ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता श्री चांगळेश्वरी मंदिर येथे संपन्न होणार आहे. या मेळाण्यासाठी ॲड . एन आर लातुर अध्यक बांधकाम कामगार संघटना बेळगाव हे कामगाराना कामगारकार्ड काढण्यापासून ते त्याना मिळणाऱ्या सुविधा यावर
मार्गदर्शन करणार आहेत हा कार्यक्रम सौ लक्ष्मी मासेकर येळळूर ग्राम पंचायत अध्यक्षा यांच्या अध्यक्षते खाली होणार आहे .
या कार्यक्रमाला गव्ह. कॉट्रॅक्टर विजय धामणेकर , रोटरी जिल्हा प्रांतपाल अशोक नाईक , अभियंते व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर विवेक धामणेकर, रिजनल हेड आल्ट्राटेक अशोक रेड्डी कोलूर ‘ टेकनिकल ऑफीसर अल्ट्राटेक गणपती मुंबारे , व सोनिया अनगोळकर, उद्योजक आर. एम .चौगुले, समाज सेवक डॉ शिवाजी कागणीकर , सेवानिवृत्त पिडीओ दुर्गापा ताशिलदार व नौदल लेप्टनंट चंदन कुमार खेमणाकर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत यावेळी कामगारानी विचारलेल्या अडचणी व समस्यांचे निवारण करून त्याना मार्गदर्शन करणार असल्याने परिसरातील कामगार वर्गाने याचा लाभ घ्यावा असे अवाहन समाज सारथी सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे
येळळूर येथे गवंडी व सेंट्रिंग कामगाराकरीता मार्गदर्शन मेळावा*
Related Posts
शाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी
Spread the loveशाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी न्यूज: बेळगावातील शाहापूर परिसरात शिवसंस्कृतीचा गौरवशाली वारसा जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने शिवकालीन युद्धकलेचा भव्य आणि थरारक कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार
Spread the loveयेळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार येळ्ळूर दि. 17- येळ्ळूरमधील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर संपूर्ण सीमाभागात संतापाची लाट उसळली. मराठी भाषीकांच्या हृदयावर घाव घालून…
