- *बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चा स्केटर देवेन बामणे जागतिक स्पर्धेसाठी निवड*

बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चा स्केटर व आर एल एस कॉलेज चा विद्यार्थी देवेन बामणे यांची जागतिक वर्ल्ड स्पर्धेसाठी निवड झाली ही निवड चाचणी मोहाली चंदिगड येथे झाली देवेन हा गेली 8 वर्षे स्केटिंग प्रशिक्षन घेत असून या निवड चाचणी साठी त्याने रात्र दिवस खूप मेहनत घेतली होती त्याची ही निवड चाचणी स्पीड सालोम या प्रकारात झाली असून दिनांक 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत 2025 सिंगापूर येथे ही स्पर्धा होणार असून यात हा बेळगांव चा स्केटर देवेन बामणे भारतीय स्केटिंग टीम मधून आपले कौशल्य दाखवणार आहे.यावेळी बेळगांव जिल्हा चे स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले त्याचे आई ज्योती बामणे वडील विनोद बामणे यांनी त्याला या स्पर्धेसाठी व देशासाठी खेळण्यासाठी भरपूर प्रोत्साहन दिले, देवेन या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेत असुन कसुन स्केटिंग सराव करत आहे त्याला, के एल ई सोसायटी चे चेअरमन डॉ प्रभाकर कोरे ,माजी आमदार शाम घाटगे श्री राज घाटगे ,कर्नाटका रोलर स्केटिंग असो चे सेक्रेटरी इंदूधर सीताराम, आर एल एस कॉलेज चे प्रिन्सिपल विश्वनाथ कामगोळ, बेळगांव जिल्हा स्केटिंग असो अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, सूर्यकांत हिंडलगेकर ,या सर्वांचे प्रोत्साहन मिळत आहे
