तिसऱ्या पीव्हीआर अंतरराज्य निमंत्र्यांच्या जलतरण स्पर्धेची सांगता. नंदिनी पेटकर व अमन सूनगार जलद जलतरणपटू स्विमर्स क्लब बेळगाव सर्वकश विजेते आबा स्पोर्ट क्लब उपविजेते


रविवार दिनांक 8 रोजी गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात संपन्न झालेल्या आबा हिंद क्लब व क्रीडा भारती आयोजित तिसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बक्षीस समारंभाचे प्रमुख पाहुणे जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन चे अध्यक्ष श्री लक्ष्मण शिंदे, क्रीडा भारती दक्षिण प्रांतचे प्रमुख श्री चंद्रशेखर जहागीरदार, श्री बसवराज, आबा क्लबचे अध्यक्ष शितल हुलबते, जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील, नवहिंद क्रीडा केंद्रचे वाय सी गोरल, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, सचिव सौ शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र, मेडल, ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आले.
या स्पर्धेत भाग घेतलेल्या विविध राज्यातील जलतरणपटूणी अनेक विक्रम प्रस्थापित केले. विविध गटातील वैयक्तिक विजेतेपद पटकावलेल्या जलतरणपटूंची नावे पुढीलप्रमाणे.
महिला गट ओपन – नंदिनी पेटकर ब्ल्यू वॉटर अकॅडमी पुणे 33 गुण, गट क्रमांक एक श्रीलेखा पारेख ब्लू वॉटर अकॅडमी पुणे पुणे 35 गुण, गट क्रमांक दोन दक्षता दुबे ब्ल्यू वॉटर अकॅडमी पुणे 35 गुण, गट क्रमांक तीन अद्विका सोनी ब्लू वॉटर अकॅडमी पुणे 35 गुण, गट क्रमांक चार एलिना कोष्टा परेरा फिट फॉर लाईफ गोवा 29 गुण, गट क्रमांक पाच क्रिशाकुलकर्णी स्विमर्स क्लब बेळगाव 19 गुण
पुरुष गट ओपन-अमन सूनगार डॉल्फिन क्लब बेंगलोर 31 गुण, गट क्रमांक एक सार्थक श्रेयकर स्विमर्स क्लब बेळगाव 31 गुण, गट क्रमांक दोन वेदांत मिसाळे स्विमर्स क्लब बेळगाव 30 गुण, गट क्रमांक तीन रियांश संधू प्याशीओनेट अकॅडमी बेळगाव 29 गुण, गट क्रमांक चार अद्वैत जोशी आबा स्पोर्ट्स क्लब बेळगाव 35 गुण, गट क्रमांक पाच नमन पाटील स्विमर्स क्लब बेळगाव 18 गुण.
वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आबा हिंद स्पोर्ट्स क्लबचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार अमित जाधव रणजीत पाटील संदीप मोहिते मारुती घाडी शुभांगी मंगळूरकर ज्योती पवार विजया शिरसाठ शिवराज मोहिते किशोर पाटील विशाल वेसणे अमित कुडची कलाप्पा पाटील वैभव खानोलकर सुधीर धामणकर सतीश धनुचे राहुल काकतकर सुनील जाधव मिस्टर केस्टीकर संजय मरगाळे स्नेहल धामणकर गौरी जूवळी, प्रसन्ना बसूतकर, स्वाती जाधव, राजश्री पाटील, गौरी बेळगोजी, विजय नाईक, भरत पाटील, विजय बोगन, ओम घाडी प्रांजल सुळधाळ राजू कडेमनी, वरून धामणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
तिसऱ्या पीव्हीआर अंतरराज्य निमंत्र्यांच्या जलतरण स्पर्धेची सांगता. नंदिनी पेटकर व अमन सूनगार जलद जलतरणपटू स्विमर्स क्लब बेळगाव सर्वकश विजेते आबा स्पोर्ट क्लब उपविजेते
Related Posts
शाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी
Spread the loveशाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी न्यूज: बेळगावातील शाहापूर परिसरात शिवसंस्कृतीचा गौरवशाली वारसा जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने शिवकालीन युद्धकलेचा भव्य आणि थरारक कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार
Spread the loveयेळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार येळ्ळूर दि. 17- येळ्ळूरमधील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर संपूर्ण सीमाभागात संतापाची लाट उसळली. मराठी भाषीकांच्या हृदयावर घाव घालून…
