विजेच्या धक्क्याने शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी सांबरा येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
परिनीती चंद्रू पालकर (वय १३, रा. महात्मा फुले गल्ली, सांबरा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती सांबरा येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होती.
शुक्रवारी सकाळी घरातील पाण्याची मोटर सुरू करत असताना अचानक तिला जोरदार विजेचा धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की ती जागीच कोसळली.
घटनेची माहिती मिळताच गल्लीतील युवकांनी तातडीने तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर परिनीतीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
परिनीती ही अभ्यासू, शिस्तप्रिय व गुणी विद्यार्थिनी म्हणून शाळेत परिचित होती. अभ्यासासोबतच शाळेतील विविध उपक्रमांमध्ये तिचा सक्रिय सहभाग असायचा. तिच्या आकस्मिक निधनामुळे आई-वडील, भाऊ व आजी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेनंतर सांबरा गावात शोकाकुल वातावरण असून, घरगुती वीज उपकरणांच्या सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
सांबरा येथे विजेचा धक्का : सातवीत शिकणाऱ्या परिनीतीचा दुर्दैवी मृत्यू
Related Posts
स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीत विद्यार्थिनीचा गौरव रेश्मा सोंटक्कीची गोवा येथील प्रतिष्ठित कंपनीत निवड
Spread the loveस्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीत विद्यार्थिनीचा गौरव रेश्मा सोंटक्कीची गोवा येथील प्रतिष्ठित कंपनीत निवड पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू; मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन “स्कायवर्ल्डमुळेच माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला” – विद्यार्थिनीची भावना बेळगाव :…
“रोलर स्केटिंगमधून जग जिंकण्याची ताकद” : शिवगंगा स्पोर्ट्स क्लबमध्ये विजेत्या स्केटर्सचा गौरव
Spread the love**रोलर स्केटिंग स्पर्धेचा बक्षीस समारंभ खेळा मध्ये…… जग जिंकण्याची ताकद* जिल्हास्तरीय तसेच क्लब पातळीवर झालेल्या विविध ठिकाणी झालेल्या स्केटिंग स्पर्धेचा बक्षीस समारंभ नुकताच शिवगंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंकवर…
