Spread the love

🌸 जटगे (ता. खानापूर) गावात ‘कर्नाटक केसरी’ कामेश पाटील आणि ‘सी.एम. चषक’ विजेता प्रेम जाधव यांचा भव्य सत्कार 🌸

जटगे (ता. खानापूर) :
गावातील तरुण पैलवानांच्या यशाचा सन्मान करण्यासाठी जटगे गावच्या पंचमंडळींकडून एक भव्य सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात ‘कर्नाटक केसरी’ किताबाचे विजेते श्री कामेश पाटील तसेच ‘सी.एम. चषक’ विजेते श्री प्रेम जाधव या दोन्ही पराक्रमी पैलवानांचा सत्कार करण्यात आला.
श्री कामेश पाटील हे जटगे गावाचे भाचे असून त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसर अभिमानाने उजळून निघाला आहे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री यादव मारुती पाटील, पै. आजोबा श्री मालाप्पा पाटील, श्री मोहन पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री सागर पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री शंकर मळीक, श्री नागो नांदोडकर, श्री परशराम सुतार, तसेच पुजारी श्री नागो पाटील, श्री शंभाजी तिनेकर आणि श्री परशराम लोटुलकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री एन. टी. हलशीकर यांनी प्रभावीपणे केले.

या प्रसंगी मान्यवरांनी दोन्ही पैलवानांच्या मेहनत, जिद्द, आणि चिकाटीचे कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

🌸 विशेष म्हणजे, या सोहळ्याला गावातील महिला वर्ग, युवावर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

या सत्कार सोहळ्यामुळे जटगे गावात अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वांनी आपल्या गावाच्या या शूरवीरांचा गौरव करत मनःपूर्वक अभिनंदन केले.