
गणपती मंदिर ते हिंडलगा रोडपर्यंत रस्ता विकास कामाला सुरुवात; आमदार आसिफ शेठ यांचा पुढाकार
बेळगाव : गणपती मंदिर ते हिंडलगा रोड या सुमारे 800 मीटर लांबीच्या महत्त्वाच्या रस्ता विकास प्रकल्पाला आमदार आसिफ (राजू) सैत यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत डांबरीकरण, मध्यभागी डिव्हायडर उभारणी, तसेच उजव्या बाजूस गटार व रिटेनिंग वॉल बांधकाम करण्यात येणार आहे.
या कामामुळे पाणी निचरा सुधारणा, रस्ते सुरक्षा आणि एकूण पायाभूत सुविधा मजबूत होणार असून, हा रस्ता दोन लेनचा करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होऊन नागरिकांना अधिक सुलभ प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांत नाराजी होती. याची दखल घेत आमदार शेठ यांनी स्वतः लक्ष घालून कामाची नियमित पाहणी केली जाईल आणि दर्जा कायम ठेवला जाईल, असे आश्वासन दिले.
या कामाच्या प्रारंभामुळे स्थानिक नागरिक व परिसरातील नेत्यांनी समाधान व्यक्त करत आमदारांच्या पुढाकाराचे कौतुक केले आहे.
गणपती मंदिर ते हिंडलगा रोडपर्यंत रस्ता विकास कामाला सुरुवात; आमदार आसिफ शेठ यांचा पुढाकार
Related Posts
शाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी
Spread the loveशाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी न्यूज: बेळगावातील शाहापूर परिसरात शिवसंस्कृतीचा गौरवशाली वारसा जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने शिवकालीन युद्धकलेचा भव्य आणि थरारक कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार
Spread the loveयेळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार येळ्ळूर दि. 17- येळ्ळूरमधील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर संपूर्ण सीमाभागात संतापाची लाट उसळली. मराठी भाषीकांच्या हृदयावर घाव घालून…
