वदंती पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा; जिल्ह्यात इंधन व सिलिंडरची कोणतीही कमतरता नाही
बेळगाव : जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस सिलिंडरची कोणतीही कमतरता नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर तात्पुरता साठा संपल्यास केवळ पाच तासांत पुन्हा इंधन उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. इंधन पुरवठा कंपन्या आणि पंप मालकांसोबत आधीच चर्चा झालेली असून कुठेही टंचाई नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिक अफवांमुळे घाबरून इंधन साठवण्याचा प्रयत्न करत असल्यानेच गोंधळ निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पेट्रोल पंपांवर बाटली किंवा कॅनमध्ये इंधन विक्रीस परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी शहर पोलीस आयुक्त भुषण भोरसे यांनीही इंधनाची अकारण साठेबाजी व बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे स्पष्ट केले. नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ 112 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
पत्रकार परिषदेत अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपसंचालक मल्लिकार्जुन तसेच हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष अजय पाई उपस्थित होते.

इंधन टंचाईची अफवा फेटाळली; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट वक्तव्य
Related Posts
शाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी
Spread the loveशाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी न्यूज: बेळगावातील शाहापूर परिसरात शिवसंस्कृतीचा गौरवशाली वारसा जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने शिवकालीन युद्धकलेचा भव्य आणि थरारक कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार
Spread the loveयेळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार येळ्ळूर दि. 17- येळ्ळूरमधील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर संपूर्ण सीमाभागात संतापाची लाट उसळली. मराठी भाषीकांच्या हृदयावर घाव घालून…
