बेळगाव:
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वारकरी महासंघ बेळगाव यांच्या नेतृत्वाखाली आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी यशस्वी करण्यासंदर्भात बेळगाव येथील क्रॉस नंबर तीन महाद्वा रोड विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली
दिंडी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिंडी चालक गुरुवर्य भाऊसाहेब पाटील महाराज यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीची सुरुवात करण्यात आली यावेळी वारकरी महासंघाच्या अहवालाचे विमोचन व पावती बुकाचे शुभारंभ करण्यात आले, बेळगाव कोल्हापूर व इतर परिसरातील वारकरी भाविकांची , पायी दिंडी सोहळ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी, विशेषतः युवा पिढीस धार्मिक ओढ लागून त्यांना सन्मार्गास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने गेली 29 वर्षे सतत बेळगाव ते पंढरपूर पायी दिंडी काढली जात आहे, यावर्षीही ही दिंडी बेळगाव येथून पंढरपुराकडे निघणार आहे, आपल्या संस्कृतीचे रक्षण करायचे त्याच बरोबर सामान्य वारकऱ्यांनाही सोयीस्कर व्हावे या दिंडीचा सर्वांना लाभ मिळावा यासाठी गेल्या 30 वर्षांपूर्वी एक संकल्प केला होता यानुसार ही दिंडी अखंडपणे सुरू आहे असे गुरुवर्य भाऊसाहेब पाटील यावेळी म्हणाले,,,, आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी मध्ये सहभागी होण्यासाठी येत्या सव्वीस तारखेला वारकरी महासंघाचे पदाधिकारी व सेवक निघणार आहेत ज्यांना आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी मध्ये सहभाग व्हायचा असेल त्यांनी आळंदी चीच फाट्यावर उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी वारकरी महासंघाचे ह भ प शंकर बाबली महाराज, यांनी यावेळी सांगितले या बैठकीमध्ये बेळगाव वारकरी महासंघाचे प्रमुख ह भ प प्रभाकर सांबरेकर, प्रभाकर काकडे, शट्टूपा पाटील, अशोक हारकारे, सुबराव गुंडोपंत हारकारे, शंकर पाटील, खाचू चिखले, ज्योतिबा मोरे, परसराम कनगुटकर, महाद्वार रोड विठ्ठल रुक्मिणी मंदिर चे अध्यक्ष मारुती जोशीलकर ,श्रीधर काकडे सह अन्य बैठकीमध्ये उपस्थित होते