Spread the love

बेळगाव:

हनुमान यात्रेनिमित्त मुतगा येथे हनुमान कुस्तीगीर संघटना आणि ग्रामस्थाच्यावतीने प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही मुतगा गावामध्ये आंबील घुगरिया गाडा मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली , गावातील प्रत्येक गल्लीमध्ये वाजत गाजत गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली, सजवलेल्या बैल जोड्यांचा समावेश प्रामुख्याने असतो त्या पाठोपाठ आंबील घुगरिया गाडा असतो अशी ही मिरवणूक पाहण्यासाठी साऱ्यांचेच गर्दी होते,

संपूर्ण गावातील पंचमंडळी ग्रामपंचायत सदस्य पंचमंडळी सह गावातील युवा वर्ग नागरिक या गाडा मिरवणुकीत सहभागी झालेले पहावयास मिळाले, अशाच पद्धतीने परंपरागत कुस्त्याही रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी होणार आहेत, यासाठी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील दमनी तलावात ह्या कुस्त्यांसाठी मैदानाचे आयोजन करण्यात आले असून तयारी अंतिम टप्यात आली आहे.या मैदानात प्रमुख कुस्ती महाराष्ट्र केसरी किरण भगत व जागतिक कुस्ती चॅम्पियन आशिष हुड्डा यांच्यात होणार आहे. किरण भगत व आशिष हुड्डा यांच्यात प्रथमच लढत होणार आहे.

दोघेही राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू असल्याने कोण जिंकणार याची कुस्ती शौकिनांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व हरियाणाच्या अनुज कुमार लिलू आखाडा यांच्यात, तिसऱ्या क्रमांकाची लढत कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार व बाळू अपराध सांगली यांच्यात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती कीर्तीकुमार कार्वे, कंग्राळी व समाधान गरुड पुणे, पाचव्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी व संजू इंगळगी दर्गा तालीम, सहाव्या क्रमांकाची कुस्ती कामेश कंग्राळी व ऋषिकेश देवकाते, सातव्या क्रमांकाची लढत प्रेम कंग्राळी व सुरेश रुपनर सांगली, आठव्या क्रमांकाची कुस्ती गुत्तप्पा दावणगिरी व कार्तिक इंगळगी दर्गा, नव्या क्रमांकाची लढत पृथ्वी कंग्राळी व गौस कुंदरर्गी दर्गा, दहाव्या क्रमांकाची कुस्ती महेश तीर्थकुंडे व हनुमंत गंदीगवाड यांच्यात होणार आहे. अशा ह्या कुस्त्या पाहण्यासाठी हजारो कुस्तीप्रेमी हजेरी लावतात आणि कुस्त्यांचा आनंद लुटतात