बेळगाव :
बेनकनहळ्ळी, गणेशपूर ज्योतीनगर ,महालक्ष्मी नगर , सरस्वती नगर, क्रांतीनगर , गंगानगर, सैनिक कॉलनी , अशा या विस्तारित बेनकनहळ्ळी गावची श्री लक्ष्मीदेवी यात्रा तब्बल 33 वर्षानंतर मोठ्या उत्साहाने होत असून या गावचे संपूर्ण नागरिक सज्ज झाले आहेत , मंगळवार दि. 23-04-2024 पासून ते बुधवार दि. 01-05-2024 पर्यंत होणार आहे विवाह वेळ शके 1946 चैत्र 15 शुक्लपक्ष मंगळवार दि. 23-04-2024 रोजी सुर्योद्याला सकाळी 7 वाजून 1 मि. श्री महालक्ष्मीदेवीचा विवाह सोहळा (अक्षतारोपन) लक्ष्मी मंदिरासमोर बेनकनहळ्ळी येथे होणार आहे.
त्यानंतर श्री महालक्ष्मीदेवी रथावर विराजमान होऊन बेनकनहळ्ळी, गणेशपूर गावामध्ये मिरवणूकीला सुरुवात होईल. त्यानंतर बुधवार दि. 24-04-2024 रोजी संध्याकाळी 4 वाजता श्री महालक्ष्मीदेवी गदगेवर स्थानापन होईल. त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रमाला सुरुवात होईल. बुधवार दि. 01-05-2024 रोजी सायंकाळी 04 वाजता श्री महालक्ष्मीदेवी सिमेकडे प्रयाण झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होणार आहे. ,,, यात्रेसाठी ग्रामपंचायतीकडून पिण्याची पाण्याची व्यवस्था आरोग्य व्यवस्था व कोणत्याच प्रकारे अनुचित प्रकार घडून नए म्ह्णून सीसीटीव्ही कॅमेरे व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लप्पा पाटील यांनी सांगितले,,तर नेहमीच समाजकार्यामध्ये अग्रेसर असलेले ग्रामपंचायत सदस्य व समाज सेवक मोनेश्वर गरग यांनीही क्रांतीनगर ज्योती नगर सह आपल्या भागामध्ये रस्ते गटारी सह इतर मूलभूत सुविधा आपल्या कार्यकाळात झाले आहे, याचा म्हला स्वार्थ अभिमान आहे ,
आता 33 वर्षानंतर होत असलेल्या महालक्ष्मी यात्रेची पूर्व सिद्धता झाली असल्याचे यावेळी मोनेश्वर गरग यांनी आपले अभिप्राय व्यक्त करताना सांगितले,, बेनकनहळीं व्याप्तीमध्ये येणाऱ्या सरस्वतीनगर भागाचाही चांगल्या प्रकारे विकास झाला आहे 2015 ते 2020 या कालावधीमध्ये जवळपास 80 टक्के विकास झाला असून रोड कामे स्ट्रीट लाईट मार्गी लागले आहे, याचबरोबर राज्यांमध्ये प्रथमच डिजिटल अंगणवाडी असलेल एकमेव सरस्वती नगर हेच आहे , याव्यतिरिक्त आरो प्लांट हे दुसऱ्या क्रमांकावर आहे, महालक्ष्मीच्या कृपाशीर्वादानेच हे सर्व कार्य माझ्या हातून घडले आहे म्हणूनच सर्वांना विनंती करतो की या महालक्ष्मी यात्रेला उपस्थितीत राहून महालक्ष्मीचा आशीर्वाद घ्यावा अशी विनंती माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य मोहन रामा सांबरेकर आपल्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले ,, अशाच प्रकारे गावातील यात्रा कमिटी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी ही आपल्या यात्रेची पूर्व सिद्धता झाली असल्याचे सांगत सर्वांनी या यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले आहे ,,तरी आपण सहकुटूंब सहपरिवार आप्तेष्ट व मित्रमंडळीसह उपस्थित राहून श्री लक्ष्मीदेवीच्या दर्शनाचा लाभ घेऊन कृपाशिर्वाद घ्यावा व आमचा आनंद द्विगुणीत करावा असे ग्रामपंचायत व यात्रा कमिटीने आव्हान केले आहे,