नवी दिल्ली:
भाजपने आज (दि. २ मार्च) लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपने दिल्लीतील मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची घोषणा केली. १९५ उमेदवारांच्या या यादीमध्ये नवोदितांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये दिवंगत माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसूरी स्वराज यांच्या नावाचा समावेश आहे.
भाजपने आपल्या पहिल्या यादीत 195 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत पंतप्रधान मोदींसह ३४ केंद्रीय मंत्र्यांची नावे आहेत. त्याचबरोबर २८ महिला आणि ४७ तरुणांची नावे यामध्ये असल्याने याला अधिक महत्त्व आल्याची चर्चा आहे.भाजपचेराष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले
भाजपाने लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्र गोवा राज्यासह सह इतर राज्यातील उमेदवारांची नावे घोषित केली मात्र कर्नाटकातील एकही उमेदवाराचे नाव घोषित केले नाही