Spread the love

बेळगाव :

आनंदनगर, वडगाव दुसरा क्रॉस येथील नाल्यावर अतिक्रमण केलेल्या घरांवर मनपाकडून बुलडोजर कारवाई केली आहे. नाल्यावर अतिक्रमण केलेल्यांना यापूर्वीच सूचना केली होती. मात्र, याची दखल घेतली नसल्याने मनपाकडून रविवारी कारवाई करून अतिक्रमण हटविले..
नाल्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण केल्याने पावसाळ्यामध्ये नाले सफाई करताना अडचण निर्माण होत आहेत. तर नाल्यांमध्ये कचरा साचून पावसात पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मनपाकडून नाले सफाईचे काम हाती

घेतले आहे. आनंदनगर वडगाव दुसरा क्रॉस येथील नाल्यावर काही जणांनी अतिक्रमण केले होते. मनपाच्या जागेवर सदर नागरिकांकडून अतिक्रमण केल्याने अतिक्रमण हटविण्यासाठी सूचना
केली होती. मात्र नागरिकांकडून अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. नाला सफाईला अडचण ठरत असल्याने मनपाकडून रविवारी धडक कारवाई करून केलेले अतिक्रमण हटविले. येथील पाच पत्र्याचे शेड

अतिक्रमण झाल्याने नाले सफाईला अडथळा

मनपा जागेवर अतिक्रमण केल्याने संबंधित नागरिकांना यापूर्वीच अतिक्रमण हटविण्यासाठी सूचना केली होती. नाल्यावर अतिक्रमण झाल्याने नाले सफाईला अडथळा निर्माण झाला होता. यासाठी सदर नागरिकांचे शेड हटवून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

– लक्ष्मी निपाणीकर (मनपा अधिकारी)

हटवून त्यांना जवळच असणाऱ्या जागेत पुनर्वसन केले आहे, अशी माहिती मनपा अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. पण अनेक वर्ष या नाल्यावर स्थायिक झालेल्या या गरीब जनतेचा आसरा गेल्याने महानगरपालिका यांची इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करेल का? ही वेळच सांगणार आहे,