Spread the love

बेळगाव :

मान्सूनच्या पहिल्याच पावसाने शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला आहे. विशेषतः विविध ठिकाणी शहरासह शिवारात पाणी साचून राहिल्याने पुराची भीती निर्माण झाली आहे. लेडी आणि बळ्ळारी नाला यंदादेखील शेतकऱ्यांसाठी शाप ठरणार आहे. पावसाचा जोर वाढल्याने शिवारात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.
दरवर्षी अनगोळ, शहापूर, येळ्ळूर, जुने बेळगाव आदी शिवारातील पिकांना बळ्ळारीचा धोका पोहचू लागला आहे. मात्र यंदा पहिल्याच पावसात शिवार जलमय झाले आहे. विशेषतः लेंडी नाल्याचे पाणी शिवारात पसरले आहे. त्यामुळे यंदादेखील बळ्ळारी नाला शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरणार आहे.

सद्यस्थितीत बळ्ळारी नाला काठोकाठ भरून वाहू लागला आहे. येत्या दोन दिवसांत पावसाचा कायम राहिल्यास बळळारी शेतीचे नुकसान होणार आहे,
येळ्ळूर रस्त्याशेजारी बळ्ळारी नाल्यांच्या तोंडावर माती टाकली आहे. त्यामुळे पाणी साचून राहिल्यास शेजारील शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषत अनगोळ परिसरातील शेती पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे बळ्ळारी नाल्याच्या तोंडासमोर टाकलेली माती काढून टाकावी आणि नाला खुला करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.