मौजे किणये येथे 26 रोजी भव्य खुली संगीत भजन स्पर्धा”।
बेळगाव : खास दीपावलीनिमित्त मौजे किणये (ता. जि. बेळगाव) येथील गावकऱ्यांच्या सहकार्याने श्री गणराया बी. सी. ग्रुप किणये यांच्यातर्फे येत्या रविवार दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी बेळगाव व कोल्हापूर जिल्हा मर्यादित भव्य खुल्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मौजे किणये येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, श्री गणेश मंदिर या ठिकाणी ही स्पर्धा घेतली जाणार आहे. गावातील प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेचा सर्वांगीण विकासासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील पहिल्या 11 क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 15001, 12001, 11001, 10001, 9001, 8001, 7001, 6001, 5001, 4001, 3001 व 2001 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे याव्यतिरिक्त उत्कृष्ट गायक उत्कृष्ट हार्मोनियम वादक तबलावादक आणि उत्कृष्ट मृदंग वादनासाठी 1101 रुपयांचे बक्षीस पुरस्कृत करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे प्रवेश शुल्क 901 रुपये असून भजनासाठी 15 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. स्पर्धेत नांव नोंदवण्याची अंतिम तारीख सोमवार दि. 20 ऑक्टोबर 2025 ही आहे. तरी सदर स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी वैजनाथ डुकरे (9380041573), नारायण पाटील (9901311982), शांताराम डुकरे (9741401294) अथवा अनिल डुकरे (8861225818) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
