कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर महिलांवरील अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या अडचणींनी भयावह रूप धारण केलं आहे. “जनतेचा विश्वासघात करून हे सरकार फक्त जाहिरातींवर आणि घोषणांवर चालत आहे, प्रत्यक्ष कृती मात्र शून्य आहे,” असा तीव्र आरोप भाजपा महिला मोर्चाच्या राज्य सचिव डॉ. सोनाली सर्नोबत यांनी केला आहे.
🔸 महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ — कायदा-सुव्यवस्थेचा ऱ्हास
बेळगावात नुकतीच घडलेली महिला अत्याचाराची घटना संपूर्ण कर्नाटकाला हादरवून गेली आहे. अशा घटना दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा निष्क्रिय दृष्टिकोन धक्कादायक आहे. “पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याऐवजी सरकार विरोधकांवर दोषारोप करत आहे,” असे सर्नोबत यांनी सांगितले.
भाजपा महिला मोर्चाने या घटनांचा निषेध नोंदवत मागणी केली आहे की —
आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी,
प्रत्येक जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस पथके स्थापन व्हावीत,
महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस धोरण तयार करून तातडीने अंमलबजावणी व्हावी.
“महिलांची सुरक्षितता हा केवळ सामाजिक नव्हे तर राज्याच्या सन्मानाचा प्रश्न आहे,” असे त्या म्हणाल्या.
🔸 मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल – काँग्रेस सरकारचे डोळे अद्याप मिटलेले
राज्यातील मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ऊस, भात, मका, डाळी, भाजीपाला अशा सर्व पिकांना मोठा फटका बसला आहे.
“काँग्रेस सरकारकडून अद्याप ना तातडीची मदत, ना प्रामाणिक पिकहानी सर्वेक्षण. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई न देता सरकार मौन पाळत आहे,” असा आरोप सर्नोबत यांनी केला.
भाजपाची मागणी स्पष्ट —
सर्व पिकहानीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी,
सर्वेक्षण पारदर्शकपणे पार पडावे,
मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी.
“काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यांच्या नावावर योजनांची जाहिरात होते, पण अंमलबजावणी मात्र शून्य,” असे त्या म्हणाल्या.
🔸 काँग्रेस सरकारची नैतिकता संपली आहे
महिलांची सुरक्षा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न या दोन्ही आघाड्यांवर काँग्रेस सरकार अपयशी ठरले आहे. केंद्रावर दोषारोप आणि दिखाऊ दौरे याने समस्यांचे निराकरण होणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
“कर्नाटकाला सबबी देणारे सरकार नको, तर जबाबदारी स्वीकारणारे सरकार हवे,” असे सांगत सर्नोबत म्हणाल्या —
<span;>> “भारतीय जनता पक्ष हे कर्तव्य पार पाडण्यासाठी सदैव तयार आहे. आम्ही महिलांसाठी न्याय आणि शेतकऱ्यांसाठी हक्क मिळवण्यासाठी सातत्याने आवाज उठवत राहू.”
🟣 – डॉ. सोनाली सर्नोबत
राज्य सचिव, भाजपा महिला मोर्चा, कर्नाटक
