Spread the love

“माझं राजकारण नि:स्वार्थ — मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर”

“मी विकासकामात कधीही राजकारण केलं नाही. माझं राजकारण हे पूर्णपणे स्वार्थरहित आहे,” असं प्रतिपादन महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केलं.

सांबरा गावातील मारुती गल्ली येथील श्री करेव्वादेवी मंदिराच्या नवीन वास्तूचे वास्तुशांती, कलशारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

“निवडणुकीत कोणी मत दिलं, कोणी दिलं नाही याकडे पाहत नाही. मी दूरदृष्टी ठेऊन क्षेत्राचा सर्वांगीण विकास करीत आहे. मंदिरांच्या विकासासाठी आतापर्यंत ₹100 कोटी निधी दिला असून 140 मंदिरांचे जिर्णोद्धार करण्यात आले आहेत,” असं त्या म्हणाल्या.

“विकासाच्या बाबतीत जाती-भाषेचं राजकारण कधीच केलं नाही. क्षेत्रातील जनता सुखी राहावी हा माझा उद्देश आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“विश्वकर्मा समाज लहान असला तरी त्यांचं मन मोठं आहे. मी केवळ देवाचं नाव घेत नाही, देवाचं काम करते. कोण फक्त बोलतं आणि कोण काम करतं, हे लोकांनाच ठाऊक आहे,” असं मंत्री हेब्बाळकर यांनी नमूद केलं.

सुमारे ₹5 लाख खर्चून बांधण्यात आलेलं हे नवीन मंदिर एक आध्यात्मिक केंद्र ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी शांतराम लोहार, ईरप्पा सुळेंभावी, नागेश देसाई, रचना गावडे, काशीनाथ धर्मोजी, सुदु पाटील, कळ्लव्वा कावळेगार, देवकी शोगणी, सपना तळवार, सुलोचना जोगाणी, भुजंग गिरमळ, संजू कांबळे, भर्मा चिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.