Spread the love

बेळगाव :

पहिल्याच पावसात स्मार्ट सिटी तुंबली, गाड्या रुतल्या दुकानांमध्ये घुसले पाणी

बेळगावात आज पावसाने जाेरदार हजेरी लावली. पण या पहिल्याच पावसाने बेळगाव स्मार्ट सिटी तुंबल्याने नागरिकांसह शहरात येणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागला. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर पाणी भरले तसेच खोदलेल्या खड्ड्यामध्ये पाणी भरल्याने अनेक गाड्या रुतल्या. दुपारी 3 वाजल्यापासून पावसाला सुरवात झाली. अचानक जाेरदार आलेल्या पावसाने वाहनधारकांची तसेच कामगारांची तारांबळ उडाली. स्मार्ट सिटीच्या कामानिमित्त ठिकठिकाणी रस्ते खोदले होते. या खोदलेल्या खड्ड्यात आणि साचलेल्या पाण्यात अनेक गाड्या रुतल्या. तसेच विविध रस्त्यावर पाणी साचलेले होते.