बेळगाव:
बेळगावचे नूतन लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलेले जगदीश शेट्टर यांचे डिजिटल न्यूज असोसिएशनच्या वतीने उपाध्यक्ष रत्नाकर गौंडी यांनी अभिनंदन केले.
पुरस्कार स्वीकारताना डिजिटल न्यूज असोसिएशनचे जगदीश शेट्टर यांनी येत्या काळात डिजिटल मीडियाला सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी सचिव कृष्णा शिंदे, सीईओ प्रसाद कंबार, प्रवक्ते इक्बाल जकाती, कार्याध्यक्ष महादेव पवार, ज्येष्ठ पत्रकार उपेंद्र बाजीकर, सुहास हुद्दार, अमृत बिर्जे, श्रीकांत काकतीकर, नागेश कालींग, व इतर संस्थेचे सदस्य उपस्थित होते.