Spread the love

बेळगावच्या सामाजिक सहकार राजकीय क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे एक ज्येष्ठ सदस्य आणि माजी नगरसेवक श्री नेताजीराव जाधव यांचा अमृत महोत्सव 15 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष श्री जयंतराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत अमृत महोत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी स्वागत समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश मरगाळे चिटणीस श्री प्रभाकर भागोजी सदस्य श्री शिवाजीराव हंगिरकर श्री श्रीधर (बापू) जाधव आणि श्री विजय जाधव यांनी इस्लामपूर येथे त्यांची भेट निमंत्रण दिले या कार्यक्रमास आपण उपस्थित राहणार असल्याचे श्री जयंतराव पाटील यांनी मान्य केले आहे