धरण आणि पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे राकसकोप जलाशय भरून वाहात आहे. गुरुवारी सायंकाळी जलाशयाचे २ दरवाजे २ इंचांनी उघडले असून जलाशय तुडुंब भरण्यासाठी अद्याप २ फूट पाण्याची गरज आहे.
जलाशयात एकूण २४७५ फुटांपैकी २४७३ फूट पाणीसाठा उपलब्ध आहे. हा जलाशय तुडुंब झाल्याने बेळगावकरांची यंदाची पाणी समस्या काही अंशी मिटली म्हणावी लागेल, बेळगावच्या इतिहासात यंदा प्रथमच राकसकोप जलाशय वेगाने भरून दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
राकसकोप जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने बेळगाव शहरालगत वाहणाऱ्या मार्कंडेय नदीत पाण्याची आवक वाढली आहे. दरवर्षी जुलै अखेर किंवा ऑगस्टमध्ये भरणारे जलाशय जुलैच्या मध्यावधीच भरल्याने हि बाब बेळगावकरांसाठी आनंदाची आहे.
राकसकोप जलाशय ओव्हरफ्लो! होऊ नये म्हणून जलाशयाचे दोन दरवाजे केले खुले,
Related Posts
एस के सोसायटी संचलित जी एस एस पदवीपूर्व महाविद्यालय बेळगाव येथे दोन दिवसीय आंतरशालेय वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महोत्सव “रेजोनन्स” शुभारंभ
Spread the love एस के सोसायटी संचलित जी एस एस पदवीपूर्व महाविद्यालय बेळगाव येथे (दिनांक 7 डिसेंबर शनिवार ) महाविद्यालयाच्या के. एम गिरी सभागृहात दोन दिवसीय आंतरशालेय वैज्ञानिक आणि सांस्कृतिक…
बेळगाव जिल्हा मराठी डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेची बैठक संपन्न, लवकरच कार्यकारिणी जाहीर
Spread the loveबेळगाव जिल्हा मराठी डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेची बैठक संपन्न, लवकरच कार्यकारिणी जाहीर बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित असलेल्या बेळगाव जिल्हा मराठी डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेची…