Spread the love

बेळगाव:

बेळगाव दक्षिण विभागातील उपनोंदणी कार्यालयासाठी आता पूर्ण वेळ उपनोंदणी अधिकारी मिळाले असून आनंद बदनीकाई यांनी गेल्या मंगळवारी उपनोंदणी अधिकारी म्हणून अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
लोकसभा निवडणूक काळातच सदर कार्यालयात विष्णूतीर्थ यांची उपनोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. तथापि ते 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर या कार्यालयात पूर्ण वेळ उपनोंदणी अधिकारी नियुक्त झाले नव्हते.

याच कार्यालयातील प्रथम दर्जा सहाय्यक सचिन मंडेद यांची प्रभारी उपनोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गेले अनेक महिने ते प्रभारी उपनोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत होते.