बेळगाव :
तारांगण ,अखिल भारतीय साहित्य परिषद व जननी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने
महिला आरोग्य बाबत जननी ट्रस्टच्या विश्वस्त प्रसूती रोग तज्ञ डॉ. मंजुषा गिझरे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
तसेच बेळगावमधील स्वकर्तृत्वाने पुढे आलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा कौतुक सोहळा दिनांक १७ मार्च २०२४ रोजी दुपारी ४ वाजता सरस्वती वाचनालय कोरे गल्ली, शहापूर या ठिकाणी आयोजित केला आहे.
या बेळगावच्या कर्तुत्वान महिला आहेत त्या म्हणजे दुर्गम भागातून गगन भरारी घेणाऱ्या अंगडी इंटरनॅशनल स्कूल व पदवीपुर्य महाविद्यालयाच्या प्राचार्या संगीता देसाई, गेली तीन दशक बेळगावकरांनाअविरत वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ.सुरेखा पोटे, ग्रामीण भागातील गावांचा विकास साधण्यासाठी सातत्याने परिश्रम करणाऱ्या उचगाव ग्राम पंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे, आर्थिक सोबत असूनही स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्व डॉ. अश्विनी मांगले, प्रत्येक स्पर्धेत विजेती ठरणाऱ्या बेळगावच्या अजिंक्य रणरागिणी गौरी लटकन हेरेकर,अनेक अडचणींवर मात करत दोन फॅशन इन्स्टिट्यूट च्या संचालिका स्वाती खटावकर,सर्वांना आपलेसे करून विद्यार्थ्यांची जडण घडण करणाऱ्या प्रतिभा सडेकर, मधुर वानिने यशस्वीतांची कीर्ती उंचवणाऱ्या मुलाखतकार मनीषा सन्नाईक महिलांनी महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान आणि नव्या पिढीला प्रेरणा म्हणून म्हणून कौतुक सोहळा आयोजित केला आहे त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.