बेळगाव :
के एल एस संस्थेच्या गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्रेया घोषाल लाईव्ह कार्यक्रमात उपस्थित श्रोते स्वर्गीय सूरात चिंब झाले.दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या कार्यक्रमात श्रेया घोषाल यांनी हिंदी,मराठी आणि कन्नड अशी पंचवीसहून अधिक गाणी सादर करून रसिकांची मने जिंकून त्यांना थिरकायला लावले.कार्यक्रमाला रसिकांनी गर्दी केली होती.पंधरा हजारहून अधिक रसिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था कॉलेज परिसरात ठेवण्यात आली होती.पिंगा ग पोरी पिंगा या गाण्याला तर टाळ्या वाजवून तरुणाईने प्रतिसाद दिला. श्रेया घोषाल यांच्या समवेत किंजल चटर्जी यांनी देखील गीते सादर केली.दिवंगत गायक के के यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी किंजल यांनी गीत सादर केले.आम्ही जे तोमार या गाण्याने श्रेया घोषाल यांनी कार्यक्रमाची सांगता केली.के एल एस व्यवस्थापन मंडळातर्फे श्रेया घोषाल यांचा अनंत मंडगी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.