बेळगाव :
भारतीय जनता पक्षाचा लोकसभा उमेदवार स्थानिक असावा या वादावर पडदा पडला असून माजी मुख्यमंत्री जगदीश शेटर हुबळी हुन बेळगावला आगमन होताच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले. बेळगाव उमेदवारीबदल भाजपा इच्छुक उमेदवारामध्ये नाराजी पसरली होती यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी म्हणून माजी मुख्यमंत्री बी एस एडूरप्पा हेही ह्या रॅलीमध्ये सहभागी होऊन भारतीय जनता पक्षाच्या कमल झेंड्याखाली सर्वांनी एकत्रित यावे व पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात बळकट करावा अशी कार्यकर्त्यांना बी एस एडुरप्पा यांनी सूचना केली असावी म्हणूनच की काय नेत्यांची व कार्यकर्त्यांची रॅलीमध्ये मोठी गर्दी झाली होती , बी एस एडुरप्पा व उमेदवार जगदीश शेटर बेळगावला आगमन होताच किल्ला दुर्गादेवी मंदिर मध्ये पूजा कार्यक्रम करून करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली, यावेळी प्रचार रॅलीमध्ये मध्यभागी येडुरप्पा जगदीश शटर व राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील , माजी खासदार मंगला अंगडी, आमदार अभय पाटील, सह इतर नेत्यांचा समावेश होता. यावेळी भाजपा नेता किरण जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की भाजपामधील उमेदवारी बदल जी नाराजी होती ती नाराजी आता संपुष्टात आले असून यापुढे स्थानिक नेत्यापेक्षा कमळ हे चिन्ह व नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावे हा एकच ध्येय साऱ्यांचा आहे, निश्चितच विजय भाजपाचा आहे असे ते म्हणाले,,, यावेळी भाजपा नेत्या सोनाली सरनोबत म्हणाले की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंत प्रधान करण्यासाठी महिला कार्यकर्त्या एकजुटीने कार्य करतील यात शंका नाही यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित असल्याचे त्या म्हणाल्या,,
हजारोंच्या संख्येने या प्रचार बाईक रॅलीमध्ये कार्यकर्ता व महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता , ही रॅली किल्ला अशोक स्तंभ मार्गे कोर्ट आवारातील क्रांतिवीर.संगोळी रायण्णा यांच्या मूर्तीला मालार्पण करून पुढे राणी चन्नमा यांच्या मूर्तीला मालार्पण करण्यात आले, यानंतर, पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला मालार्पण करून,राणी चन्नमा सर्कल मधील गणपती मंदिर मध्ये आरती झाल्यानंतर, पुढे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीला मालार्पण करून, कपिलेश्वर मंदिरच्या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला मालार्पण करण्यात आले दुपारचे वेळ असल्याने उन्हाने लाही लाही होत असले तरी कार्यकर्ते रॅली सोडून बाहेर गेले नाहीत , यानंतर, महात्मा फुले रोड मार्गावरून गोवावेस मधील जगत ज्योती बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तीला मालार्पण करून, सदाशिवनगर मधील बीजेपी महानगरच्या कार्यालया जवळ या बाईक रॅलीची सांगता झाली