बेळगाव :
मार्च 27 बुधवार दिनांक दहा वाजता माजी मुख्यमंत्री व बेळगाव लोकसभा भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री जगदीश शट्टर. हे हिरे बागेवाडी टोल नाका मार्गे बेळगांव लोकसभा क्षेत्राला येणार आहेत, व हजारो बीजेपी कार्यकर्त्यांच्या संख्येत त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे, असे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सव नगराध्यक्ष पत्रकार परिषदेमध्ये कळविले आहे. पत्रकार परिषदेमध्ये कळविल्यासारखे सकाळी 10 वाजता हिरे बागडी टोलनाकाच्या मार्गे आगमन करून, 10.30 वाजता किल्ला दुर्गा देवी मंदिर मध्ये पूजा कार्यक्रम करून,नंतर हजारोंच्या संख्येने तिथून बाईक रॅलीला सुरुवात होईल व पुढे रॅलीचा मार्ग खाली दिल्या प्रमाणे राहील.
कोर्ट आवारातील क्रा.संगोळी रायण्णा यांच्या मूर्तीला मालार्पण करून पुढे राणी चन्नमा यांच्या मूर्तीला मालार्पण होईल, पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला मालार्पण करून,राणी चन्नमा सर्कल मधील गणपती मंदिर मध्ये आरती होईल, पुढे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीला मालार्पण करून, कपिलेश्वर मंदिरच्या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला मालार्पण होईल, नंतर महात्मा फुले रोड मार्गावरून गोवावेस मधील जगत ज्योती बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तीला मालार्पण करून, सदाशिवनगर मधील बीजेपी महानगरच्या कार्यालया जवळ या बाईक रॅलीची सांगता होईल. असे कळविण्यात आले आहे