बेळगाव :
भारतीय जनता पक्षाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. भाजप युवा नेते किरण जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले. महिला भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली. यावेळी शिवनामाचा जयघोष करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा असे सांगतानाच शिवचरित्राची पारायणे घरोघरी झाली पाहिजेत, असे यावेळी बोलताना किरण जाधव म्हणाले.
याप्रसंगी प्रज्ञा शिंदे, प्रियांका कलघटकर, रेखा मुचंडी, नगरसेवक जयंत सौंदत्ती, विजय कदम, विजय भद्रा, देशपांडे, रुपेश पाटील, राजन जाधव, मयूर जाधव, अभिजित कंग्राळकर, दिनेश शिरोळकर, संतोष बोकडे यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.