बेळगाव:
शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे सीमाभागातील परंपरानुसार गुरुवार दि 9 मे रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी छत्रपती शिवाजी उद्यान येथे प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला. शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते विधीपूर्वक पूजन करण्यात आले
शिवभक्त पूजा किणीकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून महाराजांची सामूहिक आरती झाल्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी असा जयजयकार केला
यंदाचे चित्ररथ मिरवणूक आव्हानात्मक असून निवडणूकी मुळे शिवभक्तांना चित्ररथ देखावा सादर करण्यासाठी आवधी कमी मिळाल्याने शिवजयंती चित्ररथा वरील देखावे साधेपणाने तरी सादर करावे,व शांततेने आणि सुरळीत मिरवणूक पार पाडण्याची जबाबदारी साऱ्यांचीच आहे.असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी केले
जे बी शहपूरकर यांनी त्यांच्या मनोगतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्य स्थापना ते त्यांची एकूण कार्यपद्धती अशी महाराजांची विविध कौशल्ये मांडली. शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताठ करून, त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांचा आदर्श प्रत्येक तरुण पिढीने घेतला पाहिजे, असे शहपूरकर यांनी सांगितले
यावेळी उपस्थित शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे सरचिटणीस जे बी शहपूरकर,मारुती पाटील, उमेश ताशीलदार, विजय कुंटे, सलोनी भोसले, वैशाली चौगुले, खुशी भोसले, प्रियांका पावशे,ओंकार खानडोळकर, प्रथमेश सालगुडे,शिवाजी पाटील,विजय दळवी,यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.