Spread the love

बेळगाव :

असे म्हणतात की पैसा अनेकांकडे असतो, पण खर्च करण्याची वृत्ती निर्माण व्हायला हवी, आणि तेही योग्य कामाला पैसा खर्च केला तर निश्चितच या कार्याचे फल मिळते, यात शंका नाही. असेच एक सुळगे येळूर गावचा सुपुत्र बिल्डर डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स असे परिचित असलेले गोविंद टक्केकर यांनी मोफत पाणी वाटप योजना राबवली आहे.

या योजनेचा लाभ राजहंस गड, देसूर , झाडशापुर, देसुर रेल्वे स्टेशन, येरमाळ, हट्टी, देवगन हट्टी सह अशा दहा ते पंधरा गावांना दररोज 40 ते 50 टँकर पाणी मोफत वाटण्याचे कार्य निरंतर फेब्रुवारी मार्च महिन्यापासून सुरूच आहे. यापुढेही जून महिन्याअखेरपर्यंत ही योजना राबवून जनतेच्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांना पिण्यासाठी लागणारे पाणी व इतर वापरासाठी पाणी पुरवण्याचा संकल्प केला गेला आहे यावेळी बिल्डर डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स व समाजसेवक गोविंद टक्केकर यांनी आपल्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले,,,तेपुढे म्हणाले की, पाण्याचा गैरवापर न करता सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे ही ते म्हणाले, संकल्प घर घर पाणी या योजनेला प्रत्येक गावातील महिला समाजसेवक गोविंद टक्केकर यांचे भरभरून कौतुक करत आहेत पाहू शकता हा एक क्षण,,, सध्या मार्च महिना सुरू आहे मार्च महिन्यात देखील पाणीटंचाई भासू लागली असल्याने साऱ्यांनाच पिण्याच्या पाण्यासह इतर वापरासाठी लागणारे पाणी गोविंद टक्केकर साहेब दररोज टँकरने पूर्वत असल्याने त्यांचे आभार मानावे तितकेच कमी असेही प्रत्येक गावामध्ये बोलले जात आहे ,