बेळगाव :
मान्यनिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सम्पूर्ण भारतभर 265 रेल्वेस्टेशनांचे उदघाटन केले.तसेच अनेक राज्यामध्ये वंदे मातरम या रेल्वे सुविधेला पण हिरवा कंदील दाखवण्यात आला.आणि सामान्य जनतेला प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली. आणि अनेक रेल्वे स्टेशनांची उदघाटन करून सुरुवात करण्यात आली.
त्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर आपल्या विश्वकर्मा समाजातील शिल्पकारांची आणि दुर्मिळ कारागिरांची अवगत असलेली कला नष्ट होऊ नये आणि या विश्वकर्मा समाज वासीयांच्या कलेला वाव मिळावा आणि या कलेतून निर्माण केलेल्या दुर्मिळ मुर्त्या,शिल्पकारांनी तयार केलेल्या नक्षीदार वस्तू आशा अनेक प्रकारच्या वस्तू विक्री करण्यासाठी स्टॉल हे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सुरू करण्याची मुभा विश्वकर्मा समाजाला देण्यात आली.
जेणे करून विश्वकर्मा समाजाची कला जोपासली जाऊन विश्वकर्मा समाजाने निर्मिती केलेले साहित्य मोठया संख्येने विक्री होऊन विश्वकर्मा समाज पुढं यावा यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.आणि अजरोजी या स्टॉल चे उदघाटन करण्यासाठीच खास श्री विश्वकर्मा सेवा संघाला आमंत्रित केले होते.याक्षणी मान्यनिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची ऑनलाइन लाईव्ह मुलाखत ही घेण्यात आली.आणि श्री विश्वकर्मा सेवा संघाने पी एम विश्वकर्मा योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवली त्याकरिता श्री विश्वकर्मा सेवा संघाचा आज घटप्रभे मध्ये मोठा सत्कार करण्यात आला यावेळीअध्यक्ष रमेश देसुरकर, जोतिबा लोहार, किरण सुतार, संदीप मंडोळकर, नामदेव लोहार, लक्ष्मण बडीगेर, वासुदेव बडीगेर, विनायक सुतार ,महेश बडीगैर, गजानन लोहार, सुनील सुतार,सह इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते