Spread the love

बेळगाव :

खानापूर काँग्रेस तालुकाध्यक्ष महादेव कोळी यांनी आज उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची मतदार यादी तपासण्यासाठी व बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची तयारी करण्यासाठी बैठक घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी कठोर परिश्रम घेण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले
यावेळी माजी आमदार आणि उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ.अंजली निंबाळकर यांनी प्रत्येक स्तरावरील लोकप्रतिनिधींना मतदार यादी सुपूर्द केली.
यावेळी महादेव कोळी तालुकाध्यक्ष केपीसीसी सदस्य खानापूर,
राजू नाईक दत्ता बेडेकर, गंगाराम वड्डर,
बेने पिंटू, सहजा सुतारा, वैष्णवी पाटील,
यावेळी खानापूर तालुक्यातील विवेक तडकर, तोयडा चांदकर, प्रियंका गावकर आदी काँग्रेसचे उच्चस्तरीय कार्यकर्ते उपस्थित होते.