Spread the love

शेतकरी परिवाहन कार्यालयासमोर धरणे धरणार खरिप पेरणी झाली आता भांगलनिची घाई सुरु झाल्याने शहरी भागातून येळ्ळूर तसेच धामणे रस्त्याने शेतकरी महिला भांगलणीसाठी मोठ्या संखेने शहापूर,धामणे,येळ्ळूर,अनगोळ शिवारात शेती असल्याने इथूनपूढे भातकापणीपर्यंत शेतात जावे लागते.त्यासाठी बसमधून सतत महिला जातात.आधी तिकिट होत तेंव्हा हवतिथे बसवाहक थांबत होते.

पण आता सरकारने महिलानां बसप्रवास मोफत केल्याने बसवाहक मधे कुठेच बस थांबवत नसल्याने महिलांची अत्यंत कुचंबना होत आहे. किवां भाड्याच्या रिक्षा,खासगी गाडीतून जातानां पैसे देऊन जाव लागत असेल तर महिलासाठी बसप्रवास मोफत कशासाठी केला आहे ?

मागच्या वर्षी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यासह मुख्य अधिकारी लमानी यांची भेट घेऊन विनंती केल्यावर त्यांनी येळ्ळूर रोडला वडगाव ते सिध्दिविनायक मंदिर,मधील बायपास,शहापूर-येळ्ळूर शिवार हद्द,पोतदार पेट्रोल पंप याठिकाणी बस थांबवली जाईल म्हणून ठोस आश्वासन दिल होतं.आणी जर वाहक बस थांबवले नाहीत तर बसचा नंबरसह फोटो काढून मला पाठवा.त्यांच्यावर कारवाई करु म्हणून सांगितल होत.पण मुजोर चालक,वाहकांनी मधे बसच न थांबवता वडगावहून बसल कि थेट येळ्ळूर आणी येळ्ळूर हून बसले कि थेट वडगाव.तशीच मुजोरी धामणे रस्त्याने बस चालवणाऱ्यांची.अशाने शेतकरी महिला अत्यंत चिडल्या आहेत.कधी येळ्ळूर रस्त्यावर येळ्ळूर, वडगाव,शहापूर तसेच इतर भागातील महिला आंदोलण करतील सांगता येतनाही.
त्यावर प्रकाश टाकण्यासाठी येत्या दोन/चार दिवसाते रयत संघटना,वडगाव,शहापूर व इतर भागातील शेतकरी मुख्य परिवाहन खाते कार्यालयासमोर धरणे धरणार आहेत.त्याचबरोबर माननिय मुख्यमंत्री,क्रूषीमंत्री,जिल्हा पालक मंत्री, जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देण्यात येणार आहे.