बेळगाव:
राष्ट्रीय पक्ष मराठा समाजावर अन्याय करत असून त्याचा निषेध करत राष्ट्रीय मराठा पक्ष प्रथमच 10 लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाच्या वतीने लोकसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झालो आहोत असे गुरुवारी शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषद मध्ये राष्ट्रीय मराठा पार्टी राज्याध्यक्ष मनोहरराव जाधव यांनी माहिती दिली .
ते पुढे म्हणाले की समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी यांच्यावरील अन्यायावर आवाज उठवण्यासाठी लोकसभेत राष्ट्रीय मराठा पक्षाची स्थापना करण्यात आली आणि पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीसाठी 10 उमेदवार उभे केले असल्याचेही ते म्हणाले. कर्नाटक मध्ये.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातून ईश्वर रुद्रप्पा घाडी, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून विनोद साळुंखे.
उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून श्यामसुंदर गायकवाड रिंगणात उतरलेले आहेत , तर धारवाड लोकसभा मतदारसंघातून जीडी घोरपडे,
हावेरी लोकसभा मतदारसंघातून
नारायण गायकवाड बीदर लोकसभा मतदारसंघातून विजयकुमार पाटील ,
बागलकोट लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत मुधोळ
शिमोगा लोकसभा मतदारसंघातून , देवराज शिंदे ,
विजापूर, गुलबर्गा या राखीव मतदारसंघातील उमेदवार लवकरात लवकर जाहीर करण्यात येतील, अशी माहिती राष्ट्रीय मराठा पक्षाचे अध्यक्ष मनोहरराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी बेळगाव लोकसभा मतक्षेत्राचे उमेदवार ईश्वर गाडी यांनीही अधिक माहिती देताना सांगितले की मराठा समाजावर राष्ट्रीय पक्षाकडून वारंवार अन्याय केला जात आहे यासाठी म्हणून मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण प्रामाणिक लढणार आहोत असे ते म्हणाले,,, मराठा समाजाने राष्ट्रीय मराठा पार्टीच्या उमेदवाराला या निवडणुकीमध्ये आपले अनमोल सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.