बेळगाव :
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगाव च्या वतीने फाल्गुन वद्य तृतीया शके 1945 या हिंदू तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. हा सोहळा छ.शिवाजी उद्यान येथे पार पडला. यावेळी प्रारंभी प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक तसेच जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील तसेच शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार घालून महाराजांचे पूजन करण्यात आले. तसेच सामूहिक आरती म्हणून महिलांच्या वतीने शिवरायांचा पाळणा म्हणण्यात आला. यावेळी प्रचारक हिरामणी मुचंडीकर यांनी शिवजयंती तिथीनुसारच का साजरी केली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले तसेच बलिदान मासकाळात शेवटच्या दिवशी होणाऱ्या धर्मवीर मुखपादयात्रेत जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन या…