बेळगाव :
हालगा-मच्छे बायपासमधील शेतकऱ्यांनो महामार्ग प्राधिकरण,प्रशासन,दलालांच्या आमिषाला अजिबात बळी न पडता तुम्हाला खोट्या गोष्टी सांगून भरपाई घेण्यासाठी लालूच लावतील.पण मा.न्यायालयाने बेळगावचा झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय बायपासमधील शेतकऱ्यांच्या शेतात पाय टाकूनये अथवा त्यांच्या पीकांची नासधूस करुनये असा आदेश असतानां महामार्ग प्राधिकरण खाते कांही खोटी कारण देत 14 मार्चपासून बायपासचे काम सुरु होते ते 4 एप्रिल 2024 रोजी मा.उच्च न्यायालयाने दाव्याचे जजमेंट पूर्ण झाल्याशिवाय बायपासचे काम करुनये म्हणून तात्काळ स्थगिती दिल्याने काम थांबले आहे.त्यासाठी बायपास रद्द होईस्तोवर पुढील लढाई सुरुच ठेवण्यासाठी आज येळ्ळूर रोड बायपास वरील शेतीत शेतकऱ्यांची बैठक पार पडली.त्यात समीती नेते रमाकांत कोंडूस्कर यांनी बायपासमधील तसेच इतर शेतकऱ्यांनी सरकारच्या कोणत्याही भूलथापानां बळी न पडता दाव्याचा निकाल लागेस्तोवर ठाम रहा.कारण विजय तुमचाच होणार आणी पीकांची नुकसानभरपाईही मीळणार आहे.असे शेतकऱ्यांचे वकील रविकुमार गोकाककर यांनी विश्वासपुर्वक सांगितले असतानां कांही शेतकरी भरपाईसाठी प्रयत्न करत आहेत ते सर्वस्वि चुकिचे आहे. महामार्ग प्राधिकरणखात्याने कितिही प्रयत्न केलेतरी ते कदापी यशस्वी होणार नाहीत. पण त्यासाठी शेतकरी आपल्या शेती देण्याविरोधात भक्कमपणे उभे असलेपाहिजेत.कारण शेतकऱ्यांच्या ठामपणावरच आजपर्यंत तात्काळ स्थगिती आदेश मीळाले आहेत.
हिच गोष्ट समीती नेते रमाकांत कोंडूस्कर यांनी शेतकऱ्यांना समजाऊन सांगत रिंगरोड,बायपास,खादरवाडी जमीन प्रकरण व इतर भूसंपादन रोखण्यासाठी येत्या निवडणूनंतर सर्वानीं मीळून प्रचंड असा शेतकऱ्यांचा बैलगाडी,ट्र्याक्कर,जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढूण सरकारला ताळ्यावर आनण्यासाठी सिध्द रहायच आहे.तरच इथला अल्पभूधारक शेतकरी वाचत त्यांच्या पुढच्या पिढ्यासाठी सरंक्षण मीळणार आहे. अन्यथा विकासाच्या नावे शेतकऱ्यांना भकास करुन विकास काय कामाचा हे दाखवून देन गरजेचे आहे.असे तेथील शेतकऱ्यांना संबोधित करतानां सांगितले.
त्याचबरोबर बायपासचे काम बंद आहे पण खासगी वाळू,विटा,दुधाच्या व इतर वाहन दिवसा व रात्री तेथून जात असतात ती येळ्ळूर रोडवर व अलारवाड जवळ निवडणुकीसाठी तपासनाके आहेत ते चुकवत तेथून जात असतात.त्यानां शेतकऱ्यांनी अडवून येथून पून्हा गेल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई करु म्हणून सांगण्यात आल्यानंतर पुढच्यावेळी येथून येणार नाही असे त्यांनी सांगितले.
पण जे तपास नाके आहेत ते प्रशासनाने येळ्ळूर रोड बायपासजवळ तसेच अलरवाड ब्रिजजवळील बायपासवर तपासनाके करुन वाहनांची तपासनी केल्यास गैरमार्गाने चालणारे धंदे बंद होण्यास मदत होईल याची प्रशासनाने दखल घ्यावी.अन्यथा गैरमार्गाचा अवलंब करण्यासाठीच का बेकायदेशीर बायपासचे काम हाती घेण्यात आल्याचा संशय बळावल्याशिवाय रहाणार नाही. कारण वेळी अवेळी तेथून वाळूविटा,दुधगाड्या व इतर वाहन जातानां शेतकऱ्यांच्या सर्रास द्द्रुष्टिस पडत आहेत.