बेळगाव :
राजहंसगड येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याला गुरुवारी प्रारंभ झाला. दीड दिवस चालणाऱ्या या पारायण सोहळ्याला दहा वर्षे पूर्ण झालीआहेत या पारायणाला राजहंसगड ग्रामस्थ वारकरी व पंचक्रोशीतील सर्व भाविक वारकऱ्यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ह भ प शिवानंद सदानंद मठपती यांच्या अधिष्ठान व ह भ प श्री गंगाराम कल्लाप्पा वालेकर यांच्या उप अधिष्ठांना खाली आयोजित केले जाते, या श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याला गावातील वारकरी व भक्तमंडळी आवर्जून उपस्थित राहून शोभा वाढवली,
गुरुवारी पहाटे चार ते सहा या वेळेत सर्व भजनी मंडळ व मास्तमर्डी येथील ह भ प परशराम कुरंगी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काकड आरती पार पडली, यानंतर राजहंसगडातील बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर सौ व श्री श्रीकांत लक्ष्मण थोरवत यांच्या हस्ते ध्वजवंदन पूजा करून पुढील कार्याला सुरुवात करण्यात आली , यादरम्यान पूजेते मानकरी सौ व श्री नारायण लक्ष्मण नागुर्डेकर व श्रीकांत रुद्रया हिरेमठ यांच्या शुभ हस्ते काकड आरतीचा प्रारंभ करण्यात आला, सौ व श्री कृष्णा सिद्धाप्पा येळेबैलकर सौ व श्री पवन परश्याम पवार यांच्या हस्ते गणेश फोटो पूजन करण्यात आले, सौ व श्री ज्योतिबा लक्ष्मण जाधव सौ व श्री सिद्धाप्पा नारायण हलगेकर यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई फोटो पूजन ,सौ व श्री लोकेश सिद्धाप्पा बिर्जे व सिद्धाप्पा नारायण हावळ यांच्या हस्ते विना पूजन, सौ व श्री जयवंत नारायण पवार युवराज नारायण नावगेकर यांच्या हस्ते ग्रंथ पूजन, सौ व श्री सदा रुक्मांना हावळ सौ व श्री संजय मनोहर कुंडेकर यांच्या हस्ते घट पूजन करण्यात आले , सौ व श्री सिद्धप्पा गणपत पवार सौ व श्री लक्ष्मण बसवंत पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज फोटो पूजन, सौ. रेणुका शंकर लोखंडे सौ, सुमन विजय मोरे यांच्या हस्ते तुळस पूजन, सौ रुद्रवा जोतिबा बोंगाळे सौ सविता संदीप चव्हाण यांच्या हस्ते श्री लक्ष्मी फोटो पूजन, सौ रेखा वासू थोरवत सौ सुनीता महेश कुंडेकर यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन, सौ व श्री रामचंद्र परसराम पवार सौ व श्री हनुमंत कृष्णा नावगेकर यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज फोटो पूजन ,सौ व श्री सातेरी सिद्धाप्पा रेडेकर सौ व श्री सुशांत विठ्ठल मोरे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज फोटो पूजन, सौ गीता नारायण पवार सौ राधिका कृष्णा पवार यांच्या हस्ते कलावती आई फोटो पूजन करण्यात आले, तर इंजिनीयर श्री ज्ञानेश्वर ज्योतिबा नरवडे संजीवनी ज्ञानेश्वर नरवडे यांच्या हस्ते होम कुंड पूजन पार पडले ,
तर सौ व श्री सदानंद नारायण जाधव सौ व श्री यल्लाप्पा नारायण निलजकर यांच्या हस्ते कासव पूजन करण्यात आले, यानंतर या साऱ्यांचा मानसन्मान करण्यात आला, दिवसभरामध्ये नव्या अध्यायनाचे वाचन यानंतर सकाळी अकरा ते एक या दरम्यान श्री सिद्धेश्वर भजनी मंडळ राजहंसगड दुपारी एक ते तीन या दरम्यान जय हरी महिला भजनी मंडळ राजगड यांचा उत्तम असा भजन झाला, यानंतर ह भ प गणपत साळुंखे महाराज माडवळे यांचे प्रवचन तर कीर्तन निरूपण ह भ प ज्ञानेश्वर माने महाराज हेरवाड यांचे झाले तर राजहंसगड येळूर देसुर नदीहळी. मास्तमर्डी सुळगा,या भजनी मंडळाने जागर भजन सादर केले, शुक्रवारी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम झाल्या नंतर काला कीर्तन चिरमुरेचे ह भ प बाळू भक्तीकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे, तर दुपारी एक ते चार या दरम्यान महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे, संपूर्ण दोन दिवसाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील समस्त वारकरी सांप्रदाय राजहंसगड श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी, गावातील सर्व युवक मंडळे, सर्व महिला मंडळ, सर्व भजनी मंडळ व समस्त गावकरी यांच्या सहकार्यातून हा पारायण सोहळा यशस्वी वाटचाल करत आहे, सकाळपासूनच गावातील पी जी पवार सर, व शाम थोरवत सिद्धाप्पा ,पवार सह अनेकांनी आपली जबाबदारी समजून पारायण सोहळा यशस्वी केला