बेळगाव :
बेळगाव शहरांमध्ये सायंकाळी 4:30 च्या दरम्यान अचानकपणे अडुळ्याच्या पावसाने हजेरी लावल्याने शहरांमधील काही सखल भागामध्ये पाणी साचले अर्धा तास अडुळ्याचा पाऊस त्याचबरोबर वादळ या दोन्हींच्या संगमामुळे पावसाने मोठ्याने जोर घेतला आणि शहरांमध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसू लागले राणी कित्तूर चन्नम्मा सरकल जवळच असलेल्या सिविल हॉस्पिटल समोर असलेल्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि हे पाणी थेट मिलन हॉटेलमध्ये शिरल्याने हॉटेल मधील साऱ्यांची तारांबळ उडाली , पाहू शकता पाणी कसे साचले ते ,,,,,, अशाच पद्धतीने शहरातील जुना धारवाडरोड ब्रिज खालील दुकानांमध्ये पाणी शिरले तसेच फोर्ट रोड येथेही पावसाचे पाणी साचले होते , यादरम्यान ब्रिज खालील पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती, एकूणच अढुळ्याच्या पावसामुळे शहरांमध्ये काही काळ का होईना पाऊस आला, आणि साऱ्यांना थंड तर केलच काही ठिकाणी पाणीही साचले गेले,