Spread the love

बेळगाव :

लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचचे अधिकृत उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी बेळगाव दक्षिण मतदारसंघात प्रचार दौरा केला आणि काँग्रेस पक्षाला मतदान करण्याची विनंती केली, .
कोरे गल्ली, वडगाव, मजगाव, अनगोळ, प्रकाश टॉकीज, शहापूर आदी ठिकाणी प्रचार दौरा काढण्यात आला .

यानंतर गोवा वेसजवळील शीख गुरुद्वाराला भेट देऊन शीख गुरुंचे आशीर्वाद घेतले यावेळी गुरुद्वारा समितीने त्यांचे स्वागत केले आणि निवडणुकीत यश मिळावे यासाठी शीख गुरूंना प्रार्थना केली. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गुरुद्वार समितीचे आभार मानले.
यानंतर हा प्रचार दौरा मजगावकडे वळविण्यात आला बेळगाव दक्षिण मतदारसंघातून यावेळी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक मते मिळणार असल्याचे सांगितले.

काँग्रेस पक्ष मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, असे मनाल हेबाळकर म्हणाले. तर यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दक्षिण मतदारसंघात यावेळी काँग्रेस पक्षाला विक्रमी मते मिळतील यात शंका नाही चार जून चार तारखेला निकाल कळेल, असेही लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या ,,यावेळी केपीसीसी सदस्य तथा बेळगाव ग्रामीणचे सरचिटणीस प्रदीप एम.जी. के.पी.सी.सी सदस्य मालगौडा पाटील, एस.एम.बेळवटकर, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.