Spread the love

बेळगाव :

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातून प्रियांका जारकीहोळी निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यांनी चिक्कोडी मतदारसंघात अगसगा,हंदीगनूर, केदनुर या गावात जोरदार प्रचार केला.

यावेळी तिन्ही गावातील नागरिकांनी प्रियंका जारकीहोळी यांना आपला पाठिंबा दर्शविला तसेच एक युवा आणि सक्षम उमेदवार काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उभे केल्याबद्दल प्रियंका जारकीहोळी यांनाच आपला पाठिंबा दर्शवला.

यावेळी प्रियंका जारकीहोळी यांचे प्रचारादरम्यान जल्लोषी आणि उत्साह पूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी महिला आणि युवतीने देखील आपला पाठिंबा प्रियांका यांना दर्शविला.

केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, दलित नेते मलेश चौगुले, काँग्रेस नेते भाऊसाहेब गडकरी, ग्रामपंचायत सदस्य चेतक कांबळे,ज्योती गवी, मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.