बेळगाव :
आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यालय, विजय नगर, हिंडलगा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.सुभाष पाटील, माजी आमदार श्री.संजय पाटील, ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री.धनंजय जाधव उपस्थित होते. या प्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त करून सर्वांना निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले यावेळी विभाग सहसंघटक सचिव श्री.जयप्रकाशजी, निवडणूक प्रभारी श्री.दादागौडा बिरादार, जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री यल्लेश कोलकार, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री उमेश पुरी, श्री संदीप देशपांडे व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
बेळगांव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील निवडणूक निर्वाहन समितीची बैठक सुद्धा घेण्यात आली, या बैठकीला श्री जयप्रकाश जी यांनी मार्गदर्शन केले.