Spread the love

बेळगाव :

प्रियंका जारकीहोळी यांची लोकसभेसाठी उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली असून अधिकृत उमेदवारी जाहीर करणे इतकेच बाकी आहे , यामुळे जारकीहोळी कुटुंब अगदी जोमाने जनसंपर्क कामाला सुरुवात केली आहे. गुरुवारी कडोली जिल्हा पंचायत व्याप्तीतील ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली, या बैठकीमध्ये काँग्रेस नेते मलगौडा पाटील व राहुल जारकीहोळी व लोकसभा निवडणुकीसाठी सज्जा असलेल्या प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कडोली गावासाठी दिलेले योगदान व काँग्रेस पक्षाच्या जनहित गॅरंटी योजना संदर्भात काँग्रेस नेते मलगौडा पाटील यांनी सविस्तर माहिती दिली ,,ते पुढे म्हणाले की, सतीश अण्णा यांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास कार्य करण्यास राहुल व प्रियंका कायम तत्पर्य आहेत, यासाठी येत्या निवडणुकीमध्ये साऱ्यांचे सहकार्य असणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.. यावेळी प्रियंका व राहुल यांनीही आपले विचार मांडले. या सभेला कडोली भागातील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य जिल्हा पंचायत सदस्य व नेतेमंडळी सह कार्यकर्ते उपस्थित होते .