बेळगाव :
येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या येळ्ळूर व अवचारहट्टी गावातील मनरेगाचे काम करणाऱ्या कष्टकरी महिलांच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना (मनरेगा) खाली रोजगाराचे काम करणाऱ्या महिलांसाठी येळ्ळूर पंचायतीकडून महिला दिन साजरा करण्यासाठी पंचायतीचे अधिकारी कामाच्या ठिकाणी आले होते. दुपारी कामावरील जेवणाच्या वेळेत येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या पिडीओ मॕडम, महिला ग्रामपंचायत सदस्या व कर्मचाऱ्यांनी सर्व महिलांनासोबत घेऊन केक कापून महिला दिन साजरा केला. यावेळी पिडीओ मॕडमनी थोडक्यात महिला दिनाबद्दलची माहिती दिली. यादरम्यान राहुल पाटील यांनी सर्व महिलांना ‘मजदूर नवनिर्माण संघातर्फे’ शुभेच्छा कळविल्या. याप्रसंगी सेक्रेटरी सदानंद मराठे, निर्मला बरसकाळे, शोभा कुंडेकर व मीना कुंडेकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या