Spread the love

बेळगाव :

समाजातील वाढते घटस्फ़ोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी नवदाम्पत्यानी तडजोडीची भूमिका घ्यावी असे आवाहन मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले.
मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा मंदिर येथे वधू वर महा मेळाव्यात श्री मरगाळे अध्यक्षांस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे शितल वेसणे, कार्याध्यक्ष शिवराज पाटील, सरचिटणीस जी. जी. कानडीकर, वधू वर मंडळ प्रमुख ईश्वर लगाडे व खजिनदार के एल मजूकर उपस्थित होते.

मराठा समाजातील लग्ने वेळेवर न लागल्याने समाजाबद्दल चुकीचा संदेश इतर समाजात जात असल्याने यापुढे लग्न वेळेवर व मुहूर्तावर लावण्याची जबाबदारी मुलांच्या पालकांची आहे तसेच हल्ली दोन वेळा लग्न लावण्याचे फॅड वाढत चालले असून मुहूर्तावर एकदाच लग्न लावावे अशी अपेक्षाही श्री. मरगाळे यांनी व्यक्त केली.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला श्री वेसणे यांनी पुष्पहार अर्पण केला तर सावित्रीबाई फुले यांच्या तसबिरीचे पूजन श्री मरगाळे यांनी केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी वधू वर मंडळाचे सदस्य ईश्वर लगाडे , मोहन सप्रे, संग्राम गोडसे, राजू पावले, कविता देसाई यांना गौरविण्यात आले.

सुरवातीला जी. जी कानडीकर यांनी स्वागत तर शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. ईश्वर लगाडे यांनी वधू वर मंडळाचा आढावा घेतला. संग्राम गोडसे यांनी आभार मानले तर सुत्रसंचालन के एल मजूकर यांनी केले .

यावेळी कोल्हापूर, पुणे, मुंबई, गोवा, धारवाड व बंगलोर येथून वधू वर व पालक उपस्थित होते.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अशोक अंकले, दत्तात्रय जाधव, प्रकाश गडकरी, रघुनाथ बाडगी, अशोक अंकले. विनोद आंबेवाडीकर यांनी परिश्रम घेतले.

कॅप्शन.. दीपप्रज्वलन करताना शितल वेसणे बाजूला ईश्वर लगाडे, प्रकाश मरगाळे, शिवराज पाटील व के. एल. मजूकर