श्रीलंकेतील कोलंबो येथे 2024 जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय पॕरा थ्रोबाॕल स्पर्धा होणार आहे. या आंतरराष्ट्रीय पॕरा थ्रोबाॕल स्पर्धेसाठी तीन संघात बेळगांव जिल्ह्यातील सात खेळाडूंची प्रथमच निवड झालेली आहे. या खेळाडूंना बेळगांवच्या शास्त्रीनगर भागातील गुजराती नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने या खेळाडूंना कोलंबोत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॕरा थ्रोबाॕल स्पर्धेसाठी येणाऱ्या खर्चामध्ये हातभार लावण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला. या स्पर्धकांना रूपये 25,000/- चा धनादेश वितरीत करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष बिपिनभाई पटेल, सचीव विजय बद्रा, ट्रस्टी भावेश चुडासमा, रीतेश पटेल, भूपेंद्रभाई पटेल उपस्थित होते.
महांतेश होंगल, मनिषा पाटील, सुरज धामणेकर, मन्सूर मुल्ला, सुरेश कुंभार, भाग्या मळली व इराण्णा होंदपन्नवर या 7 स्पर्धकांची आंतरराष्ट्रीय पॕरा थ्रोबाॕल संघात निवड झाली असून ते लवकरच बेंगलोरमार्गे कोलंबोला रवाना होणार आहेत.
श्रीलंकेतील कोलंबोला आंतरराष्ट्रीय पॕरा थ्रोबाॕल स्पर्धा खेळण्यासाठी प्रथमच परदेशी जाणाऱ्या या स्पर्धकांना बेळगांवच्या दानशूरांनी मदत करावी असे ‘आॕपरेशन मदत’ ग्रूपच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे, जर कोणास या दिव्यांग खेळाडूंना मदत करायची असल्यास त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे माध्यमांशी बोलताना राहुल पाटील यांनी सांगितले