बेळगाव :
बामणवाडी गावाजवळ राष्ट्रीय पक्षी मोराला रस्त्यावरील कुत्र्यांनी चावा घेतला
बामणवाडी येथील गावातील मुले – श्रीहरी पायण्णाचे व गौतम कणबर्गकर हे कामावरून घरी परतत असताना पक्ष्याला कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याचे पाहून त्यांनी तात्काळ त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली.त्यांनी कुत्र्यांपासून पक्ष्याचे प्राण यशस्वीपणे वाचवले.
मुसळधार पाऊस पडत असल्याने पटकन शांताई वृद्धाश्रमात आणून श्री विजय मोरे – (शांताई वृध्दाश्रमकार्याध्यक्ष, माजी महापौर ), आणि श्रीमती मारिया विजय मोरे यांना माहिती दिली. सरांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कल हेड संतोष दरेकर यांना फोन केला.आमची टीम टिळकवाडीहून घटनास्थळी पोहोचली आणि जखमा स्वच्छ करून आणि अँटीसेप्टिक क्रीम लावून प्राथमिक उपचार केले. आम्ही ताबडतोब कर्नाटक राज्य वन विभागाला कळवले: श्री विनय गौडर सर- DRFO, श्री शंकर कोळेकर- DCF, श्री निर्वाणी – DRFO आणि वन विभागाची टीम लवकरच मोराला पकडण्यासाठी पोहोचत आहे.आम्ही बेळगावकरांनी रिअल लाइफ हिरोज – श्रीहरी पायनाचे आणि गौतम कणबर्गकर