बेळगाव :
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव च्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची हिंदु तिथीनुसार (जेष्ठ शु.द्वादशी जयंती) साजरी करण्यात आली. यानिमित्त धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. प्रारंभी प्रेरणा मंत्राने सुरुवात करून संभाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक व दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावचे जिल्हाप्रमुख श्री विश्वनाथ पाटील व शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर संभाजी महाराजांचे श्लोक म्हणून ध्येय मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी उपस्थित धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. पूजेचे पौरोहित्य प्रथमेश हुरकडली यांनी केले. यावेळी विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, किरण बडवानाचे, चंद्रशेखर चौगुले, शंकर भातकांडे,शिवाजी मंडोळकर,गजानन पवार, गजानन निलजकर, अमोल केसरकर, राम सुतार, सागर कडोलकर, अमित लगाडे, अंकुश केसरकर, अतुल केसरकर, विजय कुंटे, सदाभाऊ जांगळे, सचिन गुरव, राजू बिरजे, संतोष कुसाने, ओमकार तलवार, ओम काकडे, गिरीश पाटील,परशराम कुंडेकर,अभिजित अष्टेकर,मारुती पाटील,संकेत सुतार,नितीन कुलकर्णी, मल्लेश बडमंजी तसेच अनेक शिवभक्त उपस्थित होते.