Spread the love

बेळगाव :

अन्नदाता शेतकऱ्यांच्या समस्या केव्हा सुटणार या नात्याकारणावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेहमी शेतकऱ्यांचे मोर्चे पाहायला मिळतात पण समस्या मात्र सुटल्याच नाहीत असेच मंगळवार ही घडले. केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात बेळगावमध्ये कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेच्या शेतकऱ्यांनी मानवी साखळी तयार करून मंगळवारी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे जोरदार निदर्शने केली.

भीषण दुष्काळात होरपळणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकार आणि जिल्हा प्रशासन दिरंगाई करत असल्याच्या निषेधार्थ आज कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेने छेडलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आज हाती घेण्यात आलेल्या या आंदोलनातील शेतकऱ्यांचा रोष पाहून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बॅरिकेड्स बंद करून शेतकऱ्यांना रोखण्याची वेळ आली.

भीषण दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्यात प्रशासन दिरंगाईचा पवित्रा उचलत आहे. दुष्काळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने तातडीने दुष्काळी मदत द्यावी, केंद्र सरकारने एकरी 50 हजार रुपये तर राज्य शासनाने एकरी ३० हजार रुपये नुकसान भरपाईची रक्कम जाहीर करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांचे कर्ज वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या फायनान्स किंवा सोसायट्यांना कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आणि शेतकऱ्यांच्या काही मागण्या तातडीने सोडण्याचे आदेश दिले