Spread the love

बेळगाव :

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे प्रशिक्षक श्री. सूर्यकांत हिंडलगेकर व सहकारी प्रशिक्षक यांच्या उपस्थितीत महिला दिन उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी पालकवर्ग व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कर्तुत्वान महिलांचा गेली 18 वर्षे या असोसिएशनतर्फे सन्मान करून स्त्रियांच्या कार्याचा गौरव केला जातो. या असोसिएशनतर्फे यावर्षी बेळगाव येथील रहिवासी डॉ. वृषाली कदम( दड्डीकर) यांचा सन्मानसोहळा आयोजित केला होता. त्यांनी लग्नानंतरही त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते श्री. गणेश दड्डीकर यांच्या प्रोत्साहनाने पीएच.डी. kcet पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि समाजासमोर एक आदर्श घडविला. याबद्दल त्यांचा सन्मान वनिता विद्यालय इंग्रजी माध्यमच्या कन्नड शिक्षिका अनिता बरेटो यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. निर्मळे गुरुजी, कलाप्पा पाटील सर, राजश्री पाटील, क्लिफ्टन बरेटो आदींनी विशेष परिश्रम घेतले.