बेळगाव :
जागतिक महिला दिन (International Women’s Day) दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतो. या दिवसाचे औचित्य साधून औचित्य साधून बेळगाव डिस्टिक डिजिटल सि.एस.सी. व्हि. एल.ई. असोसिएशनच्या मार्फत दिनांक 8 मार्च 2024 रोजी महिला दिन साजरा करण्यात आला.
शुक्रवारी सकाळी निपाणी येथील दिपाली गणेश घोडके,तर पांगीरे गावातून सुनीता पवन नरे तसेच चिकोडीतून समीना डोंगरकडे या महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान डिजिटल कॉमन सर्विस सेंटरच्या संचालक महिलांचा गौरव बेळगाव डिस्टिक डिजिटल सि.एस.सी. व्हि. एल.ई. असोसिएशनचे अध्यक्ष राम भदरगडे व जनरल सेक्रेटरी सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.ऑफिस महिला कर्मचारी यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देवून त्यांना भेटवस्तू देणेत आली.
यावेळी राम भदरगडे ,सुनील जाधव समीउल्ला यांना सर्व महिला कर्मचारी व पदाधिकारी यांना महिला दिनांच्या शुभेच्छा देवून त्यांची लाभणारी साथ अनमोल असल्याचे सांगितले.
डी एम. मालिकार्जुन यांनी कॉमन सर्विस सेंटरच्या महिला कर्मचारी यांच्या कामाच्या पद्धती त्यांच्याकडे असणारी जबाबदारी त्या कश्या पद्धतीने पार पाडत असून त्यांचा कामाचे कौतुक केले. तसेच समीउल्ला , आणासाहेब पाटील अमन माने, विवेकानंद स्वामी,सचिन मांगवते, शंकर पाटील, सागर मगदूम यानी आपले मनोगत व्यक्त केले.