गोकाक धबधबा येथील पर्यटन सुरक्षितकडे गांभीर्याने लक्ष देऊन अतिउत्साही पर्यटकांना लगाम, धबधबा जवळ जाण्यास बंदी

गोकाक: आंबोलीसह पश्चिम घाटमाथ्यावर होणाऱ्या संततधार पावसामुळे घटप्रभा नदीला पूर येऊन बेळगाव जिल्ह्यातील गोकाकचा धबधबा प्रवाहित झाला आहे. मात्र या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक जीव धोक्यात घालून पर्यटनाचा आनंद लुटत असल्याने…

बेळगाव पासून जवळच असलेल्या वर्षा पर्यटनासाठी आंबोलीला जाणार असाल तर सावधान

बेळगाव: पर्यटनासाठी आंबोलीला जाणार असाल तर सावधान…! कारण तुमच्या खिशाला आर्थिक दंडाचा फटका बसू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधबा व घाट परिसरात असलेल्या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करणे आणि अतिउत्साही…

Other Story

📰 बातमी येळळूर प्रभाग क्रमांक ९ मध्ये गटर साफसफाई कामाचा शुभारंभ प्रभाग क्रमांक ९, प्रताप गल्ली येळळूर येथील हनमंतगौंड व्यायाम शाळेसमोरील गटर गेल्या अनेक वर्षांपासून दगड-माती पडल्याने पूर्णपणे मुजलेली होती. त्यामुळे या भागातील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत स्थानिक महिला व नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्या सौ. शांता काकतकर व राकेश परीट यांच्याकडे विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. लक्ष्मी भरत मासेकर तसेच अभिवृद्धी अधिकारी पूनम गडगे मॅडम यांना या समस्येविषयी माहिती देत तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. नागरिकांच्या मागणीनुसार आज या गटर साफसफाई आणि दुरुस्ती कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. लक्ष्मी भरत मासेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य राकेश परीट, शांता काकतकर, तसेच इतर सदस्य व नागरिक उपस्थित होते. या उपक्रमामुळे येळळूर परिसरातील स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे. — 🗞️